जळगाव (प्रतिनिधी) खोटे नगर ते बांभोरी उड्डाणपूल दरम्यान नेहमी अपघात होत असतात . या अपघातामध्ये निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतोय. आज देखील एका उमद्या तरुणाचा बळी गेलाय. त्यामुळे द्वारका व आहुजा नगर स्टॉपवर गतिरोधक टाका बनवा, अन्यथा चक्काजाम आंदोलन करू, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
मेकॅनिकल इंजीनियरिंगचा पेपर देण्यासाठी जात असलेल्या तरुणांच्या दुचाकीला आयशर ट्रकने धडक दिली या धडकेनंतर दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या खाली येत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहारातील खोटे नगरजवळील वाटीकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्यां सुमारास हा अपघात झाला. प्रशांत भागवत तायडे (वय-३०, रा. गहूखेडा ता.रावेर जि. जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. तर जयेश द्वारकानाथ पाटील (वय-२३, रा. गहूखेडा ता. रावेर) हा या अपघातात गंभीर जखमी झाला होता.
दरम्यान, या अपघातानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले हे प्रचंड आक्रमक झालेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम व नही NAHI च्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करत जनआंदोलनाचा इशारा दिला. योगेश देसले यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी श्री.येडई साहेब यांच्याशी संपर्क साधून परिसरातील जनभावना लक्षात घेऊन आहुजा नगर व द्वारका नगर जवळ गतिरोधक बनविण्याची मागणी केली. तसेच गतिरोधक टाकले गेले नाहीत. तर जनआंदोलन छेडत चक्काजाम करण्यात येईल, असा इशाराही दिला.
















