बोदवड (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी भाग भुसावळ रामसिंग सुलाने यांच्या निलंबनास कारणीभूत ठरलेले अवैध ऊत्खनन प्रकरण बोदवड तालुक्यातील जलचक्र येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाचे मालमत्तेवर ४ कोटी ४४ लक्ष ६६ हजार,५४४.५५ रुपयांचा बोजा बसवला गेला आहे.
जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाने अवैध ऊत्खनन करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याची तक्रार आमदार चंद्रकांत पाटील तसेच शिवसेनेचे सुनील पाटील, दिपक माळी ,अमोल व्यवहारे या कार्यकर्त्यांनी २८ एप्रिल २०२० रोजी केली होती. यानंतर सदरील तक्रारीची चौकशी कामी जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती गठित केली होती आणि तिच्या अहवालानुसार दंड ठोठावला होता.
या प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा विधानसभेत प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी यांनी अधिकार नसतांना दंडास स्थगिती दिल्याचे निदर्शनास आणले होते. याप्रकरणी संबधित स्टोन क्रशर मालकांचे खुलासे अमान्य करण्यात आले होते व त्यांना तहसीलदार श्वेता संचेती यांनी स्वामित्व ,दंड,व इतर बाबीनुसार सदर रक्कम भरणा करण्याचे आदेश पारित केले होते. मात्र सदर भरणा न झाल्याने महालक्ष्मी स्टोन क्रशरचे विलास पाटील यांचे भूमापन क्र.६६/२ मालमत्तेवर जमीन1/आर आर सी कावि १०५/२०२३ दि १४/३/२०२३ अन्वये आदेश पारित करून गौण खनिज वसुली बोजा बसवला आहे.