धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यीनींना धानोरा व गारखेडा या खेड्यावरून पायी येणाऱ्या ४७ विद्यार्थिनींना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने मोफत सायकली वाटप करण्यात आल्या आहेत नुकताच पाळधी येथे झालेल्या सायकली वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थिनींसह पालक वर्ग उपस्थित होते.या विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर अंतर पायपीट करावी लागत असल्याने अनेक समस्या येत होत्या.यामुळे वेळेची बचत होईल तसेच सायकलींचा मोफत पुरवठा केल्याने विद्यार्थिनी तसेच पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने मुलींना मोफत सायकल वाटप केल्या ने ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमेश महाजन,उपाध्यक्ष मधुकर देशमुख,सचिव काशिनाथ मिस्त्री, सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक एम एच चौधरी,ए के पाटील आर बी महाले,बी आर महाजन,एच आर महाजन,के आर महाजन,डी बी महाजन,ए ए पाटील,के ए वारुळे,एस एम महाजन,बी एस माळी,के बी महाजन,बी डी सुतार,पी एन माळी आदींनी आभार मानले आहेत.