चाळीसगाव (प्रतिनिधी) शिवसेनेच्या महिला आघाडी व शिवसेना पदाधिकाऱ्यांमार्फत किरीट सोमय्याच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आले.
शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमय्याच्या फोटोला चपला जोडे मारत लाथा बुक्क्यांनी तुडवत संतप्त घोषणा दिल्यात. शासनाने सोमय्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून कारवाई करावी व त्याचे संरक्षण काढून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमूख नाना कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, भीमराव खलाणे, सुनील गायकवाड, शैलेंद्र सातपुते, महेंद्र जयस्वाल, किरण आढाव, महीला आघाडीच्या उप जिल्हाप्रमूख मोहिनी मगर, विधानसभा क्षेत्र प्रमूख सुनंदा काटे, तालूका प्रमूख सविता कुमावत, शहरप्रमुख कविता संजय, साबळे निर्मला, आरक सुनिता पवार, सुलतानाबी अहमद खान, कांताबाई राठोड, संगीता जाटे, सगिता मिस्तिर, अंजली काळे, बेबी चव्हाण, युवा सेनेचे प्रशांत कुमावत, रवींद्र चौधरी, हर्षल माळी, रॉकी धामणे तसेच जगदीश महाजन, सुधाकर मोरे, विजय महाले, दिलीप पाटील, आशिष सानप, अनिल पाटील, दिलीप राठोड, अण्णा पाटील, रामेश्वर चौधरी, हिम्मत निकम, देवचंद साबळे, विलास भोई, रोहित जाधव, चेतन आढाव, चेतन कुमावत, सचिन पाखरे आदी उपस्थित होते.