हैदराबाद (वृत्तसंस्था) सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हैदराबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीची भिंत कोसळून एका मुलासह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तेलंगणा राजधानी हैदराबाद येथे मंगळवारी (दि. १३) उशिरा ही दुर्दैवी घटना आहे. हैदराबादच्या बदलागुडा भागात मुसळधार पावसामुळे एक बोल्डर घरात पडला. मात्र, दुर्घटनेची माहिती मिळताच उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या परिसरात सध्या बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, मुसळधार पासवामुळे या भागातील अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. काल हैदराबाद आणि इतर परिसरात मोठया प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती.