जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात लग्नाच्या कार्यक्रमात दारूपिण्याच्या वादातून डोक्यात बियरची बाटली फोडून दुखापत करून तसेच खिश्यातील ५०० रूपये जबरी काढले व धाक दाखवून गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावून नेल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश दिलीप कुंभार (वय-२५) रा. गणपती नगर पिंप्राळा हा तरूण हातमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या घरासमोर रहिवाश्यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. त्यांनी नाचण्याचा कार्यक्रम देखील सुरू होता. राकेश कुंभार हा घरच्या ओट्यावर बसून लग्नाचा कार्यक्रम पाहत होते. लग्नात नाचणारे राकेश मिलिंद जाधव (वय-२५) रा. मळी चौक पिंप्राळा, गंमप्या, वण्या (दोघींचे पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. बौध्दवाडा आणि योगेश पाटील चायनिजवाला रा. गणपती नगर पिंप्राळा हे चौघे राकेश कुंभारजवळ येवून दारूपिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली. यात राकेश जाधवने त्यांच्या हातातील बिअरची बाटली राकेश कुंभारच्या डोक्यात मारल्याने डोक्याला जखम झाली. तसेच राकेश कुंभारच्या खिश्यातील ५०० रूपये जबरी कढले व बिअरचा बाटलीचा धाक दाखवून गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावून घेतली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.