जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बी.जे.मार्केट शेजारील रेडक्रॉस सोसायटीच्या बाजुला एका अनोळखी माहिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्हापेठ पेलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता महिलेला मयत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील बी.जे.मार्केट शेजारील रेडक्रॉस सोसायटीच्या बाजुला अनोळखी माहिलेने गळफास घेतल्याने मृत्यूमुखी पडली. जिल्हापेठ पेलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांच्या खबर वरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली असुन मयत वृद्धा ९० ते ९५ वर्षे वयाची आहे. अद्यापही महिलेची ओळख पटलेली नाही.
















