जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘नाका तिथे शाखा’ या उपक्रमांतर्गत आज शहरातील काव्य रत्नावली चौकात ज्येष्ठ नागरिकांची संवाद साधण्यात आला.
सामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्यांच्या बाबतीत ज्येष्ठ नागरिकांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. मा. राजसाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राला खरोखर गरज आहे अशी अपेक्षा ही व्यक्त केली. शहरामध्ये रस्ते,वीज,पाणी,प्रदूषण, वाहतूक व्यवस्था या बाबतीत खूप त्रास असल्याचेही चर्चेतून समोर आले.
मनसे तर्फे नाका तिथे शाखा हा उपक्रम संपूर्ण शहरभर राबविण्यात येणार असून रोज संध्याकाळी नोकरवर्ग, मजूर वर्ग, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, ट्रक चालक, डॉक्टर, इंजिनीयर, पारिचारिका, सफाई कामगार, व्यापारी,फेरीवाले, विद्यार्थी या सर्वांसोबत संपर्क साधला जाणार आहे. नागरिकांच्या विविध समस्या नोंदणी करून रचनात्मक धोरण तयार करून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी दिली.
आजच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, उपशहराध्यक्ष ललित शर्मा, सतीश सैंदाने, चेतन पवार, विभाग अध्यक्ष साजन पाटील, दीपक राठोड, संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, सचिव महेंद्र सपकाळे, आशुतोष जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.