जळगाव (प्रतिनिधी) कौटुंबीक वादातून सुनेने आपल्या वयस्कर सासू, सासऱ्यांना घराबाहेर काढल्याप्रकरणी सासूने सुनेविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. परंतु, दुर्दैव असं की हक्काच्या घरातूनचं बाहेर काढण्यात आल्यानंतर सासू सासऱ्यांना जिल्हा पोलीस ठाण्याच्या आवारातच रात्र काढावी लागली.
निवृत्ती नगरात हे वृध्द दाम्पत्य वास्तव्यास आहे. मुलगा औरंगाबाद येथे नोकरीला आहे. मुलगा व त्याच्या पत्नीचा घटस्फोटाचा खटला सुरू आहे. मे महिन्यापासून माहेरी गेलेली सून भावासह अचानक मंगळवारी रात्री सासरी आली. तिने सासू सासऱ्यांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढले. लागलीच वृध्द दाम्पत्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पण, हक्काच्या घरातूनचं बाहेर काढण्यात आल्यानंतर सासू सासऱ्यांनी जिल्हा पोलीस ठाण्याच्या आवारात रात्र काढली. बुधवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. पोलिसांनी निवृत्तीनगर गाठून सूनेला नोटीस बजावली आहे.
बुधवारी रात्री हे दाम्पत्य जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या आवारात थांबून होते. याठिकाणी पोलिसांना भेटून त्यांनी घराची चावी मिळवून देण्यासाठी विनंती केली. दरम्यान दुसरी बाजू जाणून घेतल्यावर पती, सासु तसेच सास याविरूध्द सुनेनेही रामानंदनगर पोलीस ठाण्यात शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटस्फोटाचाही वाद न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.