एरंडोल (प्रतिनिधी) शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलिसात दोन चुलत्यांसह पाच जणांविरुद्ध खुनाचा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, आबा भगवान महाजन हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह एरंडोल शहरातील मारोती मढी येथे वास्तव्याला आहे. त्यांना सुरेश, तुकाराम आणि मगन असे तीन भाऊ आहे. त्यांच्या आईच्या हिस्स्याचे शेत जो मुलगा करेल तो मुलगा त्यांना वर्षाला १५ हजार रूपये देईल असे ठरविण्यात आले होते. दरम्यान, यावर्षी याच शेताच्या वादातून आवा महाजन यांचे इतर तिन भाऊ सुरेश, तुकाराम आणि मगन यांच्याशी गुरुवार १२ मे रोजी सकाळी ७ वाजता वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आबा महाजन यांना मारहाण करत असल्याचे पाहून त्यांचा मोठा मुलगा उमेश हा तिथे आला. याचा राग आल्याने सुरेश महाजन, तुकाराम महाजन, मगन महाजन, तुकारामचा मुलगा मनोज आणि पत्नी उषा बाई आणि इतरांना आवा महाजन आणि उमेश महाजन यांनावेदम मारहाण केली. तर उमेशला गुप्तांगावर लाठ्याकाठ्यांनी वेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी जळगाव येथे जाण्याचा सल्ला दिला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
मयताची आई सुनीता महाजन यांच्या फिर्यादीवरून, जेठ तुकाराम भगवान महाजन, पुतण्या मनोज तुकाराम महाजन, जेठ सुरेश भगवान महाजन, पुतण्या अनिल सुरेश महाजन, जेठाणी उपाबाई तुकाराम महाजन सर्व रा. एरंडोल यांच्याविरोधात एरंडोल पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पो निरी ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव हे करीत आहेत.