नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत २८ हजार ३२६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २६० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
गेल्या २४ तासांत देशभरात २८ हजार ३२६ कोरोनाबाधित आढळले असून २६० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, २६ हजार ३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३ कोटी २९ लाख २ हजार ३५१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ४ लाख ४६ हजार ९१८ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट झाली असून सध्या ३ लाख ३ हजार ४७६ रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही १ टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९७.७७ टक्क्यांवर आहे. देशभरात गेल्या २४ तासांत ६८ लाख ४२ हजार ७८६ जणांचं लसीकरण करण्यात आलंय. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ८५ कोटी ६० लाख ८१ हजार ५२७ लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय.
राज्यातील स्थिती
राज्यात शनिवारी दिवसभरात ३ हजार ७२३ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून, ३ हजार २७६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, राज्यात ५८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आतीपर्यंत एकूण ६३,६०,७३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,११९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८८३४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.