नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात ४० हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ३९,०९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ५४६ कोरोनाबाधितांनी जीव गमावला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३५,०८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९ हजार ०९७ नवीन रुग्ण आढळले. तर ५४६ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल (शुक्रवार) ३५,३४२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३५ हजार ०८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ४ लाख ०८ हजार ९७७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यांत देशात ३ कोटी १३ लाख ३२ हजार १५९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०५ लाख ०३ हजार १५९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २० हजार ०१६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
४२ कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २३ जुलैपर्यंत देशभरात ४२ कोटी ७८ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात ४२ लाख ६७ हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४५ कोटी ४५ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात १६.३१ लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांहून कमी आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल ६,७५३ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ९७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६० लाख २२ हजार ४८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के आहे. राज्यात काल १६७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०९ टक्के झाला आहे.