नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ४२ हजार ६१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३३० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ६१८ कोरोनाबाधित आढळले असून ३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी २९ लाख ४५ हजार ९०७ झाली आहे. तर एकूण मृतांची संख्या ४ लाख ४० हजार २२५ झाली आहे. गेल्या २४ तासांत ३६ हजार ३८५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण ३ कोटी ३१ लाख १ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशात सध्या ४ लाख ४ हजार ६८१ सक्रीय रुग्ण उपचाराधीन आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७.४३ आहे. तर, देशातील विकली पॉझिटीव्हीटी रेट ३.६३ वर असून हा दर गेल्या ७१ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा खाली आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट २.५० टक्क्यांवर असून ही चांगली बाब आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४ हजार ३६० जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ४ हजार ३१३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ९२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,७७,९८७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३७६४३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.