नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ४२ हजार ९०९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३८० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२ हजार ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३ लाख ७६ हजार ३२४ रुग्ण उपचाराधीन आहेत. रविवारी दिवसभरात ३४ हजार ७६३ जण कोरोनातून बरे झाले असून देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.५१ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत कोरोनातून ३ कोटी १९ लाख २३ हजार ४०५ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील आठवडी पॉझिटीव्हीटी रेट २.४२ टक्क्यांवर असून हा दर गेल्या ६५ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी दरात वाढ झाली असून ३४ दिवसांनी हा दर पुन्हा तीन टक्क्यांपेक्षा वर गेला आहे. सध्या डेली पॉझिटीव्हीटी रेट ३.२ टक्क्यांवर आहे. गेल्या २४ तासांत देशात ३२ लाख १४ हजार ६९६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.यासह एकूण लसीकरण ६३. ४३ टक्क्यांवर झालं आहे.
राज्यातील स्थिती
रविवारी दिवसभरात राज्यात ४ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १३१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. तर, ३ हजार ५१० रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात १३७१५७ कोरोनाबाधित रूग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला. तर, सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६४ लाख ५६ हजार ९३९ वर पोहोचली असून आतापर्यंत ६२ लाख ६३ हजार ४१६ जण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९७ टक्क्यांवर आहे.