नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ९२० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ५० हजार ३५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, ५७७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण ८४ लाख ६२ हजार ८१ करोनाबाधितांमध्ये ५ लाख १६ हजार ६३२ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७८ लाख १९ हजार ८८७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २५ हजार ५६२ जणांच्या संख्येचा समावेश आहे. देशात गेल्या पाच आठवडय़ांपासून दरदिवशी करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे दरदिवशी नव्याने लागण होणाऱ्यांहून अधिक आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील घटही कायम असून त्यांचे प्रमाण देशातील एकूण बाधितांच्या संख्येच्या केवळ ६.१९ टक्के इतके आहे.















