जळगाव(प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात आगामी चार दिवसांत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्याचीही शक्यता असल्याने प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, त्यात आहे. आता आणखी हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील आहे. १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे. होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे सर्व लहान व मोठ्या धरणांखालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या अतिवृष्टीमुळे आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यात अनेक नद्यांवरील लहान व मोठ्या प्रकल्पांचा धरणसाठा १०० टक्के पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे सर्व लहान व मोठ्या धरणांखालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची केले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. याविषयी सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असून, नियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून योग्य कार्यवाही करावी, असेदेखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पाटील यांनी सूचित केले आहे.
















