बोदवड (प्रतिनिधी) आजच्या एकविसाव्या शतकात रोजगाराभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित अभ्यासक्रम उपयुक्त असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक एम.बी.पाटील यांनी केले. ते बोदवड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कार्य्राक्रमात बोलत होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रतिनिधींची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व्दितीय वर्षाच्या अभ्यासक्रम निश्चिती संबंधीची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी भुषविले. कार्यक्रमात प्राचार्य व्ही.आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. व्ही.पी चौधरी, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक एम. बी. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेत प्राध्यापकांना, वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासक्रमावरील विविध मुद्दे ,नव्या शैक्षणिक धोरणातील अडचणी आणि आवाहने , विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विषयाबाबतची धोरणे आदी विषयावर प्राध्यापक एम. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी द्वितीय वर्षाच्या एकूण पाच विषयांचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करून चर्चा कऱण्यात आली.
सर्व तज्ञ प्राध्यापकांनी एकत्रित विचार विनिमय करून विद्यार्थी हित लक्षात घेउन अभ्यासक्रम निश्चित केला. या कार्यशाळेत जळगाव ,धुळे ,नंदुरबार, जिल्ह्यातील ,विविध महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयातील प्राध्यापकांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली.
प्रास्तविक ,कार्यशाळेच्या समन्वयक डॉ .गीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र जोशी , सौ.कांचन दमाडे तर आभारप्रदर्शन डॉ. रुपेश मोरे यांनी केले. यावेळी डॉ. चेतन कुमार शर्मा, नितेश सावदेकर, डॉ.ईश्वर म्हसलेकर, विशाल जोशी, संदीप बरडे, युवराज आठवले,अजित पाटील, समीर पाटील, राजू मोपारी, अतूल पाटील यांनी परिश्रम घेतले.