चोपडा (प्रतिनिधी) येथील व्यापारी महामंडळाची नुतन कार्यकारिणीची निवड नुकतीच झाली आहे. बुधवारी सायंकाळी व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती तथा माजी आमदार मनीष जैन यांची उपस्थिती लाभणार आहे.
व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून अमृतराज सचदेव, कार्यकारी अध्यक्ष -सुनील बरडिया, प्रमुख मार्गदर्शक – अनिल वानखेडे, संजय कानडे, जीवन चौधरी, भूपेंद्र गुजराथी, सुनील बुरड, संजय श्रावगी, उपाध्यक्ष – दिपक राखेचा, उमेश कासाट , प्रफुल्ल स्वामी , नरेंद्र तोतला, शाम सोनार, सचिव – प्रविण राखेचा, सहसचिव – विपीन जैन, कायदेशीर सल्लागार – ऍड. धर्मेंद्र सोनार तर जवळपास 78 व्यापाऱ्याची संचालक म्हणून निवड बिनविरोध झाली असून प्रसिद्ध प्रमुख म्हणून लतीश जैन, मिलिंद सोनवणे आदीं सह अनेक व्यापारी बंधुना संचालक मंडळात घेतले आहे.
या सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळयाचा कार्यक्रम 26 रोजी संध्याकाळी 7 वाजता संस्कार मंडपमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून माजी आमदार व उद्योगपती मनिष जैन, तहसीलदार- भाऊसाहेब थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी शिक्षण मंडळचे चेअरमन संदिप पाटिल, उद्योजक वसंतकाका गुजराथी, वैद्यकीय सम्राट डॉ विकास हरताळकर, पोलिस निरीक्षक के.के पाटिल, संस्थापक चेअरमन महावीर पतसंस्थाचे शांतीलाल बोथरा, जैन समाजाचे मा.संघपती माणकलाल चोपडा, व्यापारी महामंडळाचे मा.अध्यक्ष विजयकुमार अग्रवाल, वरिष्ठ सलाहकार चंदुलाल पालीवाल, महावीर पतसंस्थाचे नवनिर्वाचित संचालक राजाराम पाटिल, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.