चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये आज शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. सुनील निकम सर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
प्रत्येक स्टॉलवर भेट देऊन, विद्यार्थ्यांशी हितगुज करून, सहभागी विद्यार्थ्यांचे प्रा. सुनील निकम यांनी कौतुक केले.
याप्रसंगी किशोर झेरॉक्सचे संचालक किशोर भाऊ रणधीर, आदरणीय मुख्यअध्यक्ष आसिफ खान सर, इकबाल जान मोहम्मद सर, जाकिर खान सर, जाहिर शेख सर, हुसैन खान सर, फरीद बशर, मसरूर खान सर, जफर अहमद सर, आरिफ खान सर, रईस मिर्जा, रफीक सैयद, शबनम बाजी, शाइस्ता परवीन, मोबिन खाटीक सर, मुदस्सीर अहेमद सर, युसुफ जफर, अनीस मिर्झा, मुशताक सैय्यद, अब्दल रहेमान सर, अमजद खान सर, अफसर खाटीक सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.