धरणगाव(प्रतीनिधी) येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिसंस्थेने पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक युवतींसाठी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचे योजिले होते. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शनकेंद्राचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. सदर केंद्र हे युनियन बॅंकेच्या शेजारी,स्टेट बॅंकेसमोर धरणगाव येथे सुरु झाले आहे. प्रवेशासाठी याच ठिकाणी कार्यालयात संपर्क करण्याचे सुचित करण्यातत आले. याप्रसंगी उदघाटक म्हणून धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, सहायक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील हे उपस्थित होते. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून डॉ. श्री तुषार वडगावकर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे साहेब यांनी ध्येय निश्चित करणे आणि वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायक मार्गदर्शन केले. डॉ तुषार वडगावकर यांनी स्पर्धा परीक्षा तंत्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यास कसा करावा या विषयी तंत्र सांगितले. या प्रसंगी वर्डी येथे झालेल्या विमान दुर्घटनेत साहसी कार्य केल्याबद्दल विमलताई भिल यांचाही साडी देऊन सत्कार करण्यात आला. तिरंगा अकॅडमीचे रामनाथ माळी, निवृत्ती माळी यांचाही सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच तालुक्यातील पोलीस, रेल्वे, पोस्ट यासारख्या विविध स्पर्धा परीक्षामध्ये यशप्राप्त करून नियुक्त झालेल्या 18 विद्यार्थ्यांचाही पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, उपाध्यक्ष यशवंत कुवर, सचिव विलास महाजन, गणिताचे गाढे अध्यापक पी. पी. पिंगळे सरतसेच सर्व कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुत्रसंचालन ए.डी. पाटील सर आभार प्रदर्शन समाधान मोरे यांनी केले. केंद्र संचालक वाय.पी. पाटील सर, बाळा रायपूरकर, विनोद चौधरी, निखील पाटील, अमोल जाधव यांनी सहकार्य केले. मयरेश्वर राजपुतच्या संपूर्ण वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.