जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले असून जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होण्याचे चित्र दिसून लागले आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर १७, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ ११, अमळनेर १, चोपडा ५, पाचोरा १, जामनेर २, यावल २, रावेर ६, पारोळा २, चाळीसगाव ३, मुक्ताईनगर १० व इतर जिल्हे १ असे एकूण ६३ रुग्ण आढळले आहेत. तर भडगाव, धरणगाव, एरंडोल आणि बोदवड या तालुक्यांमध्ये दिवसभरात एकही रूग्ण आढळून आलेला नाही.