नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ३ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात ३० हजार ५७० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ४३१ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ५७० कोरोनाबाधित आढळले असून ४३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३८ हजार ३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवीन बाधितांसह देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३३ लाख ४७ हजार ३२५ झाली असून आतापर्यंत ३ कोटी २५ लाख ६० हजार ४७४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ९७.६४ टक्क्यांवर आहे. देशात सध्या ३ लाख ४२ हजार ९२३ सक्रीय रुग्ण उपचाराधीन आहेत. तर कोरोनामुळे आतार्यंत ४ लाख ४३ हजार ९२८ जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, देशाचा विकली पॉझिटिव्हीटी रेट सध्या १.९३ टक्के असून हा रेट गेल्या ८३ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्क्यांवर असून गेल्या १७ दिवसांपासून हा दर ३ टक्क्यांपेक्षा खाली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल ३,७८३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ३६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख १७ हजार ०७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०७ टक्के आहे. राज्यात काल ५६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ४९ हजार ०३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.