पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात चुलत काकांच्या मुलाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षेय तरुणीला बळजबरीने शेतात घेऊन जाऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणी शौचास गेली असता आरोपी हा तिथे आला व तिला शेतात ओढून घेऊन गेला. तरुणीने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहेत.