जळगाव (प्रतिनिधी) मद्याच्या नशेत पोलीस शिपाई असलेल्या पतीने पत्नीला मारहाण करीत तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच विवाहितेचे दागिने हिसकावून घेत त्यातून मौजमजेसह दारुसाठी विल्हेवाट लावली. तसेच सासरच्यांनी देखील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी विवाहितेने पोलिसात तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबियांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील माहेर असलेल्या १९ वर्षीय तरुणीचे मूळ साकेगाव येथील रहिवासी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले, मात्र त्यानंतर तो पोलीस कर्मचारी काही दिवसातच तो दारु पिऊन घरी येत पत्नीला मारहाण करू लागला. तसेच मद्याच्या नशेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडून पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. शिवाय तिला जिवे मारण्याची धमकी देऊन रात्रीच्या वेळी तिला घराबाहेर काढून पाच लाख रुपयांची मागणी केली होती. हा छळ असह्य झाल्यानंतर विवाहितेने तात्काळ शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
लग्नात दिलेल्या स्त्रीधनाची दारुसाठी विल्हेवाट !
लग्नात विवाहितेच्या वडिलांनी दिलेली सोन्याची चैन व सोन्याची अंगठी असा ९४ हजार ४०४ रुपयांचा ऐवज घेऊन दारु पिण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी त्याची विल्हेवाट लावली. या प्रकरणी विवाहितेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती, सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रिया दातिर करीत आहेत.
पतीपाठोपाठ सासू, नणंदकडून विवाहितेचा छळ !
पतीकडून दारुच्या नशेत अनैसर्गिक कृत्य करुन त्रास दिला जात होता. त्याचबरोबद पतीपाठोपाठ सासू व नणंद यांच्याकडून देखील त्रास देत होते. विवाहितेने माहेरून पाच लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेला मारहाण करण्याविषयी तिच्या चिथावणी देत असे. विवाहितेकडून तिचे मंगळसूत्र