पैठण (वृत्तसंस्था) पतीच्या निधनानंतर तेराव्याचा कार्यक्रम संपवून चुलत सासूच्या घरामध्ये आराम करीत असलेल्या एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित महिलेने चुलत दिराविरोधात नुकतीच फिर्याद दिली असून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेच्या पतीचे तेरा दिवसांपूर्वी निधन झाले होते. शनिवारी तेराव्याचा सकाळचा विधी पार पाडल्यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पीडित महिला ही शेजारीच असलेल्या चुलत सासूच्या घरी गेली. यावेळी चुलत दीर हा एकटाच घरी होता. त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून पीडितेवर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितले तर, जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित महिलेने रविवारी पाचोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरुन आरोपी दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यापासून आरोपी फरार झाला आहे. दरम्यान, पतीच्या निधनानंतर तेराव्याच्या दिवशीच महिलेवर चुलत दिराने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.