जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रसार माध्यमातून प्रसारित होत असून संबंधित घटनेच्या निपक्षपातीपणे तपास करून संबंधितांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जळगाव पोलीस अधीक्षकांना एका निवेदनद्वारे केली आहे.
जळगाव शहरात शासकीय विश्राम गृह अजिंठा येथे १४ वर्षीय अल्पवधीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रसार माध्यम महा न्यूज २४x७, यु ट्युब चॅनलवर प्रसारीत होत आहे. यांत जळगाव जिल्ह्यातील दोन आमदार यांनी व त्यांचे कार्यकर्त्यांनी संबंधीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रसार माध्यमातून प्रसारीत होत आहे. संबंधीत घटनेच्या निपक्षपातीपणे तपास करून संबंधीतांना तात्काळ अटक करावे, अशी मागणी जळगाव काँग्रेस मार्फत करण्यात येत आहे.
याप्रसंगी जिल्ह्याचे नेते आ. शिरीषदादा चौधरी यांचे नेतृत्वात ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहर जिल्हा अध्यक्ष श्याम तायडे यांचे प्रमुख उपस्थिती प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.