मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र काँग्रेसने काल झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेबद्दल बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा टि्वट करत निषेध केला. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव,” असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलंय.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी एकच गदारोळ केला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाईं फुले यांच्या लग्नाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सत्ताधारी पक्ष चांगलाच आक्रमक झाला. कोश्यारीनी आपल्या अभिभाषणाला सुरवात केल्यानंतर सभागृहात त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
कॉग्रेसने कोश्यारींवर टीका केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते, अशी खोचक टीका काँग्रेसने केली आहे. शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या कोश्यारीवर कॉग्रेसने हल्लाबोल केला आहे. ”काय ते हातवारे, काय ते हसणं…सारचं किळसवाणं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव!, असे टि्वट काँग्रेसने केले आहे.
















