जळगाव (प्रतिनिधी) 23 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी सूट-बूट घालून एक मोठी गर्जना केली होती – “माझ्याकडे एक सीडी आहे, जर माझ्यामागे ईडी लागली, तर ती सीडी मी बाहेर काढीन!” त्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. परंतु आज, शुक्रवार 25 जुलै 2025 रोजी त्या कथित “सीडी”ला तब्बल 5 वर्ष, 57 महिने, 248 आठवडे, 1736 दिवस झाले, तरी ती सीडी ना बाहेर आली ना दिसली!
म्हणजेच 41,664 तास – 24,99,840 मिनिटे उलटून गेल्यानंतरही खडसेंकडील सीडीचा काही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे आता जनतेच्या आणि माध्यमांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे – “दादा, कुठे आहे ती सीडी?”
खडसे यांनी अनेकदा सार्वजनिक व्यासपीठांवर त्या “सीडी”चा उल्लेख करत विरोधकांवर गंभीर आरोप केले. मात्र, आजपर्यंत ना कोणती सीडी सादर केली गेली, ना त्यातून कोणताही खुलासा झाला. त्यामुळे हे फक्त चर्चेतील राहण्यासाठी केलेले धक्कादायक विधान होते की राजकीय विरोधकांना अडचणीत आणण्याचा एक खेळ?
मंगेश चव्हाण यांचा थेट सवाल
भाजप नेते मंगेश चव्हाण यांनीही खडसेंना थेट सवाल केला आहे – “23 ऑक्टोबर 2020 ला पक्षात प्रवेश करताना आपण सीडीचा उल्लेख केला होता, ती सीडी गेली कुठे? जर ती खरोखर होती, तर आजवर का सादर केली नाही?”
ते पुढे म्हणाले, “फक्त बेछूट, निराधार आरोप करून मीडियामध्ये चर्चेत राहायचं हेच आता खडसेंचं काम उरलं आहे. एखाद्याला राजकीय आयुष्यातून उठविण्यासाठी त्याच्यावर संशय निर्माण करणं, चारित्र्यावर शिंतोडे उडवणं हा त्यांचा जुना पद्धतशीर धंदा राहिला आहे