मुंबई (प्रतिनिधी) : जैन इरिगेशनच्या इंजेक्शन मोल्डींग एचडीपीई फिटींग विभागाने भारतात पहिले आयएस 8008 चे परवानाधारक म्हणून मानांकन घेतले होते. या कार्याला अधोरेखित करत विश्व मानक दिनाच्या (14 ऑक्टोबर) औचित्याने भारतीय मानक ब्युरोने गौरव केला. मुंबई येथील हॉटेल मेलुदा द फर्न येथे रोजी जैन इरिगेशनचा सन्मान कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. जनमेजय नेमाडे आणि श्री. सुकुमार यांनी कंपनीच्या वतीने स्वीकारला. तारापूर अणूऊर्जा केंद्राचे केंद्र संचालक डॉ. संजय मुलकलवार यांच्या हस्ते हा गौरव प्रदान केला गेला.
जागतिक मानक दिन दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. भारतीय मानक ब्युरो पश्चित क्षेत्रीय कार्यालय मुंबईतर्फे बीआयएस मानक चर्चासत्र व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ‘Standards for sustainable Development Goals – A Shared Vision for a Better World’ अर्थात ‘सतत विकार लक्ष्यों के लिए मानक बेहतर विश्व हेतु साझा दृष्टिकोण’ असा विषय होता. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश ग्राहक, नियामक आणि उद्योगांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या मानकीकरणाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. जागतिक मानक दिन पहिल्यांदा 1970 मध्ये साजरा करण्यात आला. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही राष्ट्रीय मानके ठरवणारी भारतातील पहिली भारतीय मानक संस्था आहे, ज्याची स्थापना 1947 मध्ये झाली. बीआयएस तर्फे रसायन, चिकित्सा उपकरण आणि हॉस्पीटल्स, सिव्हील इंजिनयरिंग, धातूकाम, इंजीनियरिंग, विद्युत तंत्रज्ञान, पेट्रोलियम, कोळसा आणि संबंधित उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स व सूचना प्रौद्योगिकी, उत्पादन व सामान्य इंजीनियरिंग (Production and General Engineering), खाद्य व कृषि, कपड़ा (Textile), जल संसाधन इत्यादि क्षेत्रांसाठी मानक देण्यात येतात.
जैन इरिगेशनने भारतात आयएस 8008 मानकाचा पहिला परवाना घेतला याबाबत कार्यक्रमातील त्यांच्या सादरीकरणात विशेष उल्लेख करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय मोठ्याभाऊंनी अर्थात भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून हे कार्य उभारलेले आहे त्यांच्या विचार व वारश्याची पुढेही वाटचाल सुरू आहे हे विशेष.