जळगाव(प्रतिनिधी ) : क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय , फैजपुर तर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित निबंध स्पर्धे मध्ये खुल्या गटामधुन मागविन्यात आलेल्या निबंधा मधून जळगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांच्या ‘ मूलोद्योगी शिक्षण ‘ या निबंधाची प्रथम क्रमांकाकरिता निवड करण्यात आली आहे, विविध प्रकारच्या आठ गटांमधून विविध विषयांवर सदर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या , पारितोषिक वितरण दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी धनाजी नाना महाविद्यालय , फैजपुर येथे होणार आहे .
आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उ म वी चे कुलगुरु डॉ व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त जयसिंग वाघ यांचे विविध महाविद्यालयांत तसेच विविध संस्थांमध्ये भाषणाचे आयोजन करण्यात आले होते, भारताने अवघ्या ७५ वर्षात विविध क्षेत्रांत केलेली अतुलनीय प्रगति त्यांनी स-प्रमाण मांडून श्रोत्यांची मने जिंकली. यसिंग वाघ यांचे विविध मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे