TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : ग्राहक बनून आलेल्या महिलने हातचलाखीने लांबवल्या सोन्याच्या १२ अंगठ्या !

vijay waghmare by vijay waghmare
April 23, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बुक केलेली सोन्याची अंगठी घेण्यासाठी आलेल्या महिला ग्राहकाने दुसऱ्या डिझाईनच्या अंगठीची मागणी केली. यावेळी दुकानदाराने महिलेला दुकाना थांबवून अंगठी घेण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या दुकानात गेले. हीच संधी साधत त्या महिलेने दुकानातून अडीच तोळ्यापेक्षा अधिक १ लाख ७७ हजार ४०० रुपये किमतीच्या १२ अंगठ्या चोरुन नेल्या. ही घटना रविवार दि. २१ एप्रिल रोजी उघडकीस आल्यानंतर बाजारपेठेत खळबळ उडाली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिझाईन पसंत नसून दुसरी दाखवा !
शहरातील गणेश कॉलनी परिसरातील राहणारे सुवर्ण व्यावसायिक योगेश पंढरीनाथ सुवर्णकार (वय ३८) यांचे सुभाष चौकातील भवानी माता मंदिराजवळ शुभलाभ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शनिवार दि. २० एप्रिल रोजी त्यांच्याकडे अंदाजे २५ वर्षीय एक महिला आली त्यांनी पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी बुक केली. बुक केलेली अंगठी आपण रविवारी घेवून जाणार असल्याचे त्या महिलेने दुकानदाराला सांगितले आणि ती तेथून निघून गेली. सांगितल्याप्रमाणे ती महिला रविवार दि.२१ एप्रिल रोजी सुवर्णकार यांच्या दुकानात आली. त्या महिलेने बुक केलेली अंगठी मागितली. मात्र ती पाहिल्यानंतर ही डिझाईन पसंत नसून दुसरी दाखवा असे तिने सांगितले. त्यामुळे सुवर्णकार हे दुसऱ्या डिझाईनच्या अंगठ्या घेण्यासाठी त्यांच्या भिलपुरा येथे दुसऱ्याच्या दुकानावर गेले.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

दुसऱ्या दुकानावर अंगठ्या घेण्यासाठी गेले अन्…!
महिलेच्या भरोशावर दिले दुकान सोडून दुकानदार योगेश सुवर्णकार हे भिलपुरा परिसरातील दुसऱ्या दुकानावर अंगठ्या घेण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी ग्राहक म्हणून आलेल्या महिलेला दुकानात थांबण्यास सांगितले. दुकानात कोणीही नसल्याची संधी साधत त्या महिलेने दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवलेल्या १ लाख ७७ हजार ४०० रुपये किमतीच्या १२ सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. अंगठ्या घेवून येण्यापुर्वीच महिला गायव महिलेने मागितलेल्या प्रमाणे सुवर्णकार हे दुसऱ्या दुकानातून सोन्याच्या पाच अंगठ्‌या घेऊन आले, मात्र त्या वेळी दुकानात महिला नव्हती. त्यांना काऊंटरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या १२ अंगठ्या दिसून न आल्याने त्यांना दुकानात चोरी झाल्याची खात्री झाली. ड्रॉवर मधून लांबवल्या अंगठ्या ग्राहक बनून आलेल्या महिलेने दुकानातील ड्रॉवरमधून २५.५०० ग्रॅम वजनाच्या १२ अंगठ्या लांबविल्या. या प्रकरणी योगेश सुवर्णकार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत धनके करीत आहेत.

पोलिसांनी केले सीसीटीव्ही फुटेज जप्त
सराफाच्या दुकानातून अंगठ्या लांबविणारी महिला दुकानात येतांना तीने आपला चेहरा रुमालाने बांधलेला होता. दुकानात अंगठ्या चोरतांना देखील ती महिला त्याच पद्धतीने उभी आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी हे फुटेज जप्त केले आहे. यामध्ये महिलेचा चेहरा ओळखू येत नसला तरी तिचा शोध घेण्यासह आणखी काही हाती लागते का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

कौटुंबिक परिस्थितीमुळे केली चोरी !
दुकानात अंगठी चोरणारी महिलेच्या बोलीभाषेवरुन ती एका चांगल्या कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे. महिलेची कौटुंबिक परिस्थिती हलाकीची असल्याने तिने तिने दर दुकानात चोरी केल्याची कबुली पोलीसांना दिली. तिच्याकडून चोरलेल्या अंगठ्या जप्त करण्यात आल्याची माहिती पो.नि. रंगनाथ धारबळे यांनी दिली.

काही वर्षापुर्वी घडलेल्या घटनेची पुनारावृत्ती
शहरातील सराफ बाजारात काही वर्षापूर्वी सोने-चांदी चोरीच्या अशाच प्रकारातून दागिने लांबवल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता पुन्हा त्याच पद्धतीचा वापर करत महिलेने चोरी केली आहे. यामध्ये चोरट्या महिलेने आदल्या दिवशी अंगठी बुक केली, सागितलेल्या दिवशी ती घेण्यासाठी देखील आली. यावेळी त्या महिलेने दुकानदाराचा विश्वास संपादन केला व दुकानदार तिला दुकानात थांबवून जाताच हातसफाई केली.

चोरलेल्यापैकी दोन अंगठ्यंची केली विक्री
अंगठ्या घेवून जात असलेली महिलेला दुचाकीवरुन त्याठिकाणी आली होती. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरुन महिलेचा शोध घेतला. दरम्यान, या महिलेने अंगठ्या चोरल्यानंतर तेथूनच जवळ असलेल्या एका सराफाच्या दुकानात त्यातील दोन अंगठ्या विकुन त्या मोबदल्यात पैसे घेतले असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानुसार त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेले असून त्या महिलेची कसून चौकशी केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeChori

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
Next Post

न्यायालयाने फेटाळला गोवंशाचा ताबा मिळवण्याचा अर्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खेडी शिवारातील विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या !

July 5, 2021

“माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही” : सुप्रिया सुळे

August 28, 2021

Today horoscope : आजचे राशिभविष्य 15 फेब्रुवारी 2025 !

February 15, 2025

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group