जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र हॉकीतर्फे पुणे येथे ७ ते १५ नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या राज्यस्तरीय खुल्या गटातील पुरुषांच्या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवड चाचणी आज श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
एन आय एस प्रशिक्षक सय्यद लियाकत अली, पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू शादाब शेख व आरिफ कुरेशी यांनी २५ खेळाडूंची निवड केली. या पंचवीस खेळाडूंचे एक कॅम्प जळगाव व भुसावळ येथे घेण्यात येणार असून त्याच्यातून अंतिम १८ खेळाडूंचा संघ निवडला जाणार असल्याचे सचिव फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
जळगाव जिल्ह्याचा निवड झालेला संभाव्य संघ खालीलप्रमाणे
इम्रान शेख, अवेज़ खाटीक, फैसल खान, शोएब भिस्ती, मुझफ्फर शेख, मीरान शेख, राहुल धुलंकर, शारीक सैय्यद, अल्तमश शेख (सर्व जळगाव), शादाब सय्यद (जळगाव पोलीस), आरिफ कुरेशी, मोहसिन शेख, रियाज़ कुरेशी, साहिल पटेल, अकबर खान, शाकिर शेख, तौसीफ कुरेशी, सुलेमान शेख, मोहम्मद अवेज़, फ़राज़ तड़वी, उमेर खान, नदीम कुरेशी (सर्व भुसावळ).
















