जळगाव (प्रतिनिधी) जळगाव एमआयडीसी मधील जी- सेक्टर मधील इन्स्टाकार्ड सर्विसेस कंपनीमधील गोडावूनचे पत्रे कापून काउंटर मधून १ लाख ११ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आलीआहे. याप्रकरणी सोमवारी रात्री एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे.
जळगाव एमआयडीसीतील जी-सेक्टर मधील प्लॉट नंबर ७ मध्ये इन्स्टाकार्ड सर्विसेस नावाची कंपनी आहे. १ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते २ सप्टेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडाऊनचे पत्रे कापून आत प्रवेश करत काउंटरमधून १ लाख ११ हजार ४३० रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना सोमवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. या प्रकरणी रात्री १० वाजता पवन किशोर गाडीलोहार वय-२७ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहे.