जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील ऐतिहासिक घटनांवर आधारित दिग्दर्शक व लेखक अभिजित देशपांडे यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ” हर हर महादेव ” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे.
जळगावातील आयनॉक्स थिएटरमध्ये मध्ये ‘हर हर महादेव’ हा चित्रपट आज प्रदर्शित होणार होता. पण तत्पूर्वी थिएटरच्या मॅनेजर यांच्याशी चर्चा करून त्यांना चित्रटातील आक्षेपार्ह घटनांची कल्पना देण्यात आली व चित्रपट प्रदर्शित करू नका, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली. थिएटरच्या मॅनेजर यांनी विनंती मान्य करत सदर चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच पेक्षकांनी काढलेल्या तिकिटांची रक्कम त्यांना परत करण्यात आली. सदर चित्रपटात दाखविण्यात आलेले अनेक घटना या छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. इतकेच नाही तर छत्रपतींचे निष्ठावंत सरदार बांदल यांच्या विषयी चित्रपटात दाखवण्यात आलेले प्रसंग बदनामीकारक आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज दस्तुरखुद्द छत्रपती संभाजीराजे यांनी देखील सदर चित्रपटास विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळे जळगावात हा चित्रपट कुठेही प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी आंदोलकांची भूमिका आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, अमोल कोल्हे, पुरुषोत्तम चौधरी, इब्राहिम तडवी सर, रिंकू चौधरी, किरण राजपुत, अनिल पवार, उज्वल पाटील, साजिद पठाण, प्रमोद पाटील, कुंदन सुर्यवंशी, राहुल टोके, हितेश जावळे, भीमराव सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.