TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव दुध संघ अपहार : आता संचालक मंडळ रडारवर? ; पोलीस जबाब नोंदवण्याची शक्यता !

एन. जे. पाटील यांचा त्रयस्थ अर्जदार म्हणून न्यायालयात अर्ज

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणात संचालक मंडळ आता पोलिसांच्या रडारवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून पोलीस त्यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटकेतील संशयित आरोपी एमडी मनोज लिमये यांच्यासह इतरांच्या जबाबात आणि पोलीस तपासात मिळालेल्या माहितीवरून आता संचालक मंडळ रडारवर? असल्याचे कळते. दुसरीकडे त्रयस्थ अर्जदार म्हणून दूध संघातील माजी सुरक्षा अधिकारी एन. जे. पाटील यांनी न्यायालयात अर्ज सादर केल्यामुळे गुन्ह्याला आता आणखी एक वेगळे वळण मिळणार असल्याचे संकेत आहेत.

जळगाव जिल्‍हा दूध उत्पादक संघात अगोदर अपहार झाल्याचा अर्ज एका गटाने केला. दुसऱ्या गटाने नोंदीमध्ये तफावत समोर आणत चोरीची तक्रार दिली. गुन्हा दाखल करवून घेत नाहीत म्हणून उपोषणही करण्यात आले. यानंतर उच्च न्यायालयातही अपील करण्यात आले. अखेर सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्यात अटकसत्र राबविण्यात येऊन कार्यकारी अधिकारी मनोज लिमये, हरी पाटील, अनिल अग्रवाल आणि रवी अग्रवाल, चंद्रकांत पाटील, किशोर काशीनाथ पाटील अशा सहा संशयितांना अटक झाली. अटकेनंतर तपासात पोलिसांनी गोळा केलेले नमुने, आवश्यक दस्तऐवज आणि पुराव्यांच्या आधारावर संशयितांचे जाबजबाब नोंदवून पंचनामेही करण्यात आले. संशयितांनी पुरविलेली माहिती, प्राप्त दस्तऐवजाच्या आधारे तपासातील प्रगती पाहता चेअरमन मंदाकिनी खडसे व संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता पोलिससूत्रांनी दिलेल्या संकेतावरून स्पष्ट होत आहे. पोलीस लवकरच चेअरमन आणि काही संचालकांचे जबाब नोंदवणार असल्याचे कळते. कारण दुध संघात तूप आणि लोणीच्या विक्रीतून होणार अपहार मागील साधारण दोन वर्षापासून सुरु असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

READ ALSO

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दूध संघात मुकेश निंबाळकर (शिवाजीनगर) यांना कॅन्टीनचे कंत्राट देण्यात आले होते, तर योगेश निंबाळकर तूप पॅकेजिंगचे काम करीत होता. यांसह प्रदीप पाटील या तिघांच्या नावे अखाद्य तूप घेतल्याच्या नोंदी सापडून आल्या आहेत. तपासाधिकाऱ्यांनी या तिघांचीही चौकशी केली आहे. प्रदीप पाटील याने मंगळवारी दुपारी तीनला लेखी अर्ज सादर करून माझा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे सांगत पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात संशयितांची जिल्‍हा कारागृहात रवानगी झाली असून, संशयितांच्या टोळीतील म्होरक्याविरुद्ध पुरावे संकलनाचे काम पोलिस करीत आहेत. न्यायालयात दाखल खटल्यात आता माजी सैनिक, तसेच दूध संघातील माजी सुरक्षा अधिकारी एन. जी. पाटील यांनी त्रयस्थ अर्जदार म्हणून अपील केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
Next Post

चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंत्योदय अन्न योजना; कार्डधारकांसाठी डिसेंबर महिन्याचे धान्य उपलब्ध

November 19, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026

राकेश सपकाळे खून प्रकरण ; आणखी एका आरोपीला पाळधीतून अटक !

November 21, 2020

उपमहापौर पदासाठी सुनील खडके यांचा अर्ज दाखल

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group