धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रवासी संघटना व शिवसेना शाखा धरणगाव यांचेकडून सतत जळगाव नाशिक बस सुरू करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील व विभाग नियंत्रक एसटी महामंडळ जळगाव यांना देण्यात आले होते.
धरणगाव येथून सकाळी सहाची धरणगाव नाशिक बस सोडली तर दुपारून धुळे मालेगाव नाशिक जाण्यासाठी प्रवाशांना बसच नव्हती, त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत होते. या प्रवाशांची मागणीची दखल महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विभाग नियंत्रक जळगाव यांना बस सुरू करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आज धरणगाव येथे बस आली असता त्या ठिकाणी वाहक व चालक यांच्या पेढे भरवून सत्कार करण्यात आला. आज बस शुभारंभ आणि पालकमंत्री यांचा वाढदिवस हा योगायोग जुळवून आला असल्याचे मनोगतात गुलाबराव वाघ यांनी सांगितले. या बस शुभारंभ प्रसंगी चालक दिलीप गुरव (जळगाव) तसेच वाहक अनिल गव्हाळ (जळगाव) यांचा सत्कार स्वागत जळगाव जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या शुभ असते करण्यात आला.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ तसेच नगराध्यक्ष निलेश चौधरी उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, नगरसेवक अहमद पठाण, भागवत चौधरी, विलास महाजन तसेच प्रवासी संघटनाचे पदाधिकारी एच डब्ल्यू पाटील, रवींद्र भागवत, बबलू कोठारी, किरण वाणी, सुनील चौधरी, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, आनंद वाजपेयी, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी रवींद्र जाधव, राहुल रोकडे, बाळू जाधव, वाल्मीक पाटील, अरविंद चौधरी, विनोद रोकडे, सतीश बोरसे, नागराज पाटील, मच्छिंद्र पाटील, गोलु चौधरी ,वसीम पिंजारी, व असंख्य शिवसैनिक व प्रवासी मंडळ उपस्थित होते. या नंतर शेवटी प्रवासी संघटनाचे एच् डब्लु पाटील यांनी समस्या सुटल्याचे समाधान व्यक्त केले व पालकमंत्री मत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.