जळगाव (प्रतिनिधी) टोळीने गुन्हे करणा-या जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. बंटी परशुराम पथरोड, विष्णू परशुराम पथरोड, शिव परशुराम पथरोड, रवींद्र उर्फ माया माधव तायडे, हर्षल सुनील पाटील (सर्व. रा. वाल्मिक नगर भुसावळ), अशी पाच गुन्हेगारांची नावे आहेत.
या पाच जणांविरुद्ध लोहमार्ग भुसावळ, भुसावळ बाजारपेठ, भुसावळ शहर, आदी पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. भुसावळ शहरासह लोहमार्ग पोलिस स्टेशन परिसरात या टोळीने दहशत पसरवण्याचे काम केले आहे. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे भुसावळ शहर परिसरात नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या गुन्हेगारांविरुद्ध वेळोवेळी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. त्यांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी त्यांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.