चोपडा (प्रतिनिधी)भारत सरकारने सुरु केलेल्या निती आयोगाचा नवोपक्रम अटल टिंकरिंग लॅब या अंतर्गत विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे आय. आर. सी. 2024 (इंटरनॅशनल रोबोटिक कॉम्पिटिशन) यात झोनल लेव्हल (इंदौर) पास करून नॅशनल लेव्हल दिल्लीसाठी नुकतीच निवड झाली. यात रोबोट आणि ए.आय. यांच्या वापर करून विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी स्पर्धेसाठी आलेल्या 125 पेक्षा जास्त टिमसोबत त्यांचे कौशल्य दाखवत घवघवीत यश प्राप्त केले. यात विद्यालयाच्या तीन टिम दिल्लीला जाण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.
IRC compitation Zonal Round Indore झोनल लेव्हल प्रथम पारितोषिक मिडल लेव्हल- सायबर बाॅट. 1.नवनीत नरेंद्र जाधव
2.भुषण संतोष पाटील.
3.सत्यम गोपाल पाटील.
4.तेजस एकनाथ शिंपी.
झोनल लेव्हल द्वितीय पारितोषिक सिनीयर लेव्हल- रोबो बाॅईज.
1.वरद अजय पाटील.
2.श्रीकांत प्रशांत चौधरी.
3.सर्वेश कल्पेश जोशी.
4.आर्यन दिपक मेढे.
झोनल लेव्हल पाचव्या स्थानी * – *क्वांटम क्रुसिडर्स
1.प्रज्ञेश ज्ञानेश्वर निकम.
2.मयुरेश सुखदेव शिंदे.
3.मेहुल घनश्याम कंखरे.
4.आदित्य सतीष भदाणे .
या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे तर त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण अजय पाटील सर,योगेश पाटील सर यांनी दिले.दिल्लीसाठी निवड झाल्याबद्दल विजयी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन, कौतुक आणि पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा. संस्थेचे अध्यक्ष डाॅ.विकास हरताळकर,माजी अध्यक्ष डाॅ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल. सचिव अँड.रविंद्र जैन, सहसचिव डाॅ.विनित हरताळकर. विश्वस्त व शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे सर.प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते
ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.जी.पाटील सर.इंग्लिश मेडीअम मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री मॅडम तसेच संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वर्ग यांनी केले