जळगाव (प्रतिनिधी) सीआयडी ऑफिसर असल्याचे सांगणाऱ्या महिलेने व्यावसायीकाला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतर महिलेने त्या व्यावसायीकाला हनीट्रॅपमध्ये अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून खंडणी वसुल केली. त्यानंतर व्यावसायीकासह त्यांच्या पत्नीला मारहाण करीत त्यांच्याजवळील ४० ग्रॅम सोन्याची चैन व मगळसूत्र जबरदस्तीने काढून नेले. ही हनीट्रॅपची घटना दि. ९ रोजी उघडकीस आल्यानंतर रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून तीला न्यायालयाने दि. १५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
डेटींग अॅपवर झाली ओळख !
शहरातील एका उच्चभ्रू परिसरात प्रौढ वास्तव्यास असून ते व्यावसायीक असून त्यांची सोशल मीडियावरील या डेटींग अॅपवर एका महिलेची ओळख झाली. त्या महिलेने आपण सीआयडीसी ऑफिसर असल्याचे सांगून तीचे पती रेल्वेत टी.सी असल्याचे व्यावसायीकाला सांगितले. मात्र त्या महिलेचा पती तिच्यासोबत दोन वर्षांपासून शारिरीक संबंध ठेवत नसल्याने दि. ७ मार्च रोजी ते धुळे येथे भेटले. याठिकाणी त्या महिलेने व्यावसायीकाला जेवणात गुंगीचे औषध देत त्यांना एका फ्लॅटवर घेवून गेली. तेथे व्यावसायीकाचे नको त्या अवस्थेत फोटो काढून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मूळची मुक्ताई नगर येथील ती हनी ट्रॅपमध्ये अडविणारी महिला सद्या रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेला शुक्रवारी अटक केली. त्या महिलेला न्यायालयात हजर केले असता, तीला दि. १५ जुलै पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्यावयीकाला मारहाण करीत जबरीने हिसकावून नेले सोने
काही दिवसांपुर्वी त्या महिलेने व्यावसायीकाच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी तीने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पंधरा लाखांची मागणी केली. दरम्यान, त्या महिलेने व्यावयीकासह त्यांच्या पत्नीला लोखंडी सळई ने मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅमची चैन व त्यांच्या पत्नीचे ३० ग्रॅमचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून तेथून निघून गेली.
रिलेशनशीप सुरु ठेव म्हणत उकळले पैसे !
जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या त्या महिलेने व्यावसायीकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच तु माझ्यासोबत अशीच रिलेशनशीप सुरु ठेव, नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. तसेच मी गरोदर राहिली असल्याचे सांगत त्या महिलेने व्यावसायीकाकडून सुमारे तीन लाख रुपये उकळले.
महिलेविरुद्ध अनेक हनी ट्रॅपचे गुन्हे !
शेजारच्यांनी व्यावसायीक दाम्पत्याला त्या महिलेच्या तावडीतून सोडवित त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. दि. ९ रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर व्यावसायीकाने त्या महिलेबाबत माहिती काढली असता, ती महिला अशाच प्रकारे लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे वसुल करीत असल्याचे समोर आले. त्या महिलेविरुद्ध यापुर्वी शहर व भडगाव पोलीस ठाण्यात हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल आहेत.