जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक १८ मार्च घेण्यात येणार आहे. या आधीच जळगावच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आज जयश्री सुनील महाजन यांना महापौर पदाची उमेदवारी जाहीर केली आहे.
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणूकीसाटी दिनांक १८ मार्च २०२१ रोजी गुरुवारी सकाळी ११.०० वाजता विशेष सभेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच पक्षाच्यावतीने महापौर पदासाठी जयश्री सुनील महाजन यांना मतदान करण्याचे निश्चीत करण्यात आलेले आहे.
गटनेते बंटी जोशी यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना व्हीप बजावला असून त्यात म्हटले आहे की, याद्वारे पक्षादेश बजाविण्यात येत असून सुचना करण्यात येत आहे की, आपण सभेच्या निश्चीत दिवशी कोणतीही सबब न सांगता सभेस न चुकता उपस्थिती दयावी तसेच व सभेचे पिठासीन अधिकारी निश्चीत करतील त्या पध्दतीने पक्षाने प्राधिकृत केलेल्या उमेदवारास मतदान करणेची दक्षता घ्यावी. पक्षादेशाचे उल्लंघन केल्यास आपणा विरूध्द महाराष्ट्र स्थानिक संस्था सदस्य अपात्रता अधिनियम १९८६ व नियम १९८७ चे तरतूदीनुसार अपात्र करणेची कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.