अकोला (वृत्तसंस्था) बस स्थानकावरून मूर्तीजापूर कडे बस ने जाणाऱ्या महिलेच्या पर्समधील ६३ हजार ५०० रुपयाचे सोन्याचे दागिने पारस फाट्यादरम्यान लंपास झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मूर्तीजापूर येथील सरोदे प्लॉट, स्टेट बँकेमागे राहणारी २५ वर्षीय महिला आपल्या दोन मुलांसह आपले माहेर असलेल्या बाळापुर शहरातील खतीब कॉलनीत राहणारे वडील मोहम्मद नईम मोहम्मद अय्युब यांच्या कडे काही दिवसांपूर्वी होती. नंतर मंगळवार २२ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वडिलांसह दोन मुलांना घेऊन बाळापुर बस स्थानकावरून संभाजीनगर ते यवतमाळ या गाडीत बसून तुळजापूरकडे जाण्यासाठी बसमध्ये गर्दी असल्याने उभे राहून जात होत्या.
पारस फाट्या दरम्यान, पर्समधील ज्वेलरीच्या दोन बॉक्स मधील एका बॉक्समध्ये चैन मंगळसूत्र व दुसऱ्या बॉक्समध्ये नेकलेस दीड़ तोळ्याचा सोनं किंमत अंदाजे ४३ हजार रुपये, कानातील ३ ग्राम किंमत अंदाजे १० हजार ५०० रुपये व दहा ग्रामच्या २ सोन्याच्या अंगठ्या किंमत १० हजार रुपये असा एकूण ६३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे कोणीतरी अज्ञात दागिने कोणीतरी चोरट्याने चोरले. याबाबतची फिर्याद सदर महिलेने बाळापुर पोलीस स्टेशनला दिली असून बाळापूर पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील अधिक तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.
















