बोदवड (प्रतिनीधी) मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या बोदवड तालुका अध्यक्षपदी शिवमती रेखा निवृत्ती ढोले यांची नियुक्ती जळगाव येथे झालेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या बैठकीमध्ये करण्यात आली.
प्रदेश उपाध्यक्ष शिवमती सुलभा कुंवर,विभागिय अध्यक्ष शिवमती मिरा जंगले व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती उषा साळुंखे ,शिवमती उषा नांद्रा , जिल्हाध्यक्ष लीना ताई पवार सुचिता पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्यावर पुढील काळामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांचे संघटन मजबूत करणे महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे विविध सामाजिक उपक्रमांमधून जिजाऊ ब्रिगेड तालुक्यातील गाव खेड्यात पोचवण्यात यावी यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.