बोदवड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवण्यासाठी संभाजी बिग्रेड, कॉँग्रेस आय, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शिवप्रेमी नागरिक यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला.
शिवद्वार येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण व पुजन करुन गाधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येऊन महात्मा फुले चौक या मार्गाने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून राज्यापाल भगतसिंग कोशारी यांना पदावरून हटवण्याची मागणीचे निवेदन तहसील अव्वल कारकुन सुशील भावसार यांना देण्यात आले. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या ही निषेध करण्यात आला. संभाजी बिग्रेड, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदावर आल्यापासून महाराष्ट्रासह जगभरात ज्यांची कीर्ती आहे असे छत्रपती शिवराय व विविध महापुरुषांचा आपली विषारी वाणी वापरून नेहमी अपमान करून महाराष्ट्रसह तमाम महापुरुष प्रेमी यांच्या भावना दुखवत आसतात. अशा समाज विघातक प्रवृत्ती असणाऱ्या राज्यपाल यांना पदावरून हटविण्यात यावे. नाहीतर संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडी यांच्यावतीने राज्यभर आंदोलन छेडेल, असा ईशारा देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अशोक निकम, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष भारत पाटील, शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख गजानन खोडके, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे संजय पाटील निवृत्ती ढोले,अनंता वाघ,शैलेश वराडे,गणेश मुलांडे,दीपक खराटे, गणेश लोहार,योगराज ढोले,गणेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास चौधरी,प्रदीप बडगुजर, रविंद्र खेवलकर,विजय चौधरी, किशोर गायकवाड, नगरसेवक भरत आप्पा पाटील,गटनेते जफर शेख, दिपक झाबंड, संजय वराडे, महिला आघाडी अध्यक्ष वंदना पाटील, उपाध्यक्ष कविता गायकवाड, अश्विनी पाटील, नगरसेविका योगिता खेवलकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरेंद्र सिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील,डॉ.सुधीर पाटील, विनोद मायकर, मेहबूब शेख,तानाजी पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेड, महाविकास आघाडी यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.