धरणगाव (प्रतिनिधी) येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने गेल्या 33 वर्षापासून सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी निमित्त मोठ्या प्रमाणावर सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. 30 जानेवारीपासून ते 6 फेब्रुवारी पर्यंत या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तने होणार असून दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायण होणार आहे. या सप्ताहाच्या नियोजनासाठी संस्थेच्या प्रांगणात बैठक पार पडली.
या बैठकीचे सूत्रसंचालन हभप. आर. डी. महाजन यांनी केले तर प्रास्ताविक हभप. प्रा. सी. एस. पाटील यांनी केले. बैठकी प्रसंगी सविस्तर मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष हभप. महामंडलेश्वर भगवानदास महाराज यांनी केले. बैठकी प्रसंगी शहरातील सर्व समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष अॅड. संजय महाजन, नगरसेवक विलास महाजन, विजय महाजन तसेच संस्थेचे पदाधिकारी कार्यकारी मंडळातील आर. डी. महाजन, डॉ. नरेंद्र पाटील, अमोल महाजन, सुनील चौधरी, जगदीश मराठे, एकनाथ महाराज, चंद्रकांत भावसार तसेच हनुमान नगर परिसरातील सामाजिक मंडळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सप्ताहाचा समाप्तीच्या महाप्रसादासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीन लाख रुपये रोख देणगी जाहीर केली आहे.