भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिंदी येथील एकाची लग्नाची हौस-मौज अवघे १० दिवसचं टिकली. कारण, लग्नाच्या दहा दिवसातच नववधूने ५० हजार रुपये किंमतीचे दागिने घेवून धुम ठोकली. याप्रकरणी नववधूसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नववधू अक्षरा मनोज रंधे (नशिराबाद, ता. जळगाव), सोनाली गोकुळ सोनार (साकेगाव, ता. भुसावळ), आशा नानासाहेब निकम (येवला रोड, वंजारवाडी, नाशिक), गोकुळ रवींद्र सोनार (साकेगाव, ता. भुसावळ), अशोक विरि ( मालदा, मोगर, ता. शहादा, ता. नंदुरबार), गुड्ड्याबाई समाधान शिपी (गाळण, ता. पाचोरा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, भडगाव तालुक्यातील शिंदी येथील २८ वर्षीय प्रमोद राजाराम शिंपी या तरुणाचा विश्वास संपादन करून सोनालीसह पाच लोकांनी त्याला ओळखीचे स्थळ दाखविले. सोनाली गोकुळ सोनार, गोकूळ रवींद्र सोनार (रा. साकेगाव, ता. भुसावळ), आशा नानासाहेब निकम (रा. नाशिक), अशोक वीरसिंग खाडे (मालदा, ता. शहादा, जि. नंदुरबार) आणि गुड्याबाई समाधान शिंपी (रा. गाळण, ता. पाचोरा) यांनी भेट घेवून तरुणाचा विश्वास संपादन करून आमच्या ओळखीची मुलगी असल्याचे सांगितले. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च करावे लागतील अशी अट घातली. त्यानुसार तरुणाच्या कुटुंबियांनी लग्नासाठी होकार दिला, आणि ३० ऑगस्ट रोजी अक्षरा रंधे या तरुणीशी लग्न लावून दिले. दरम्यान, नवविवाहिता भुसावळ येथे बहिण- पाहुण्यांना भेटण्यास जाते, असे सांगून घरून निघाली मात्र ती परतलीच नाही. सोबत दागिने घेवून भूसावळ येथून पसार झाली. हा प्रकार ३० ऑगस्ट २०२० ते ११ सप्टेंबर २०२१ दरम्यान फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. आपली फसवणूक झाली असे लक्षात येताच प्रमोद शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.