जळगाव (प्रतिनिधी) के. के. उर्दु गर्ल्स हायस्कुल मुख्याध्यापकपदी महिला मुख्याध्यापिकेची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी अमन एज्युकेशन अॅन्ड सोशल मल्टीपर्पज सोसायटी व महाविद्यालयातील पालकांचे जळगाव शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, के. के. उर्दू गर्ल्स हायस्कुल, ईस्लामपुरा, जळगाव येथे असुन संपुर्ण मुलींची माध्यमिक विद्यालय आहे. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवा शर्ती) नियमावली १९८१ नियम क्र. ३ मुख्याध्यापक अर्हता व नेमणूक मधील मुद्दा क्र. ४ मध्ये स्पष्टपणे नमुद आहे. मुलींच्या माध्यमिक शाळेच्या बाबतीत किंवा महिला अध्यापक विद्यालयाच्या बाबतीत पोट नियम (१) खंड ‘ब’ मध्ये ठरवून दिलेल्या शर्ती पुर्ण करणाऱ्या व समाधानकारक सेवा विषयक पुर्ववतः असणाऱ्या जेष्ठतम शिक्षिकेस पुरुष शिक्षक तुलनेने तिची जेष्ठता लक्षात न घेता त्या शाळेची, विद्यालयाची मुख्याध्यापिका / प्राचार्य म्हणून नेमणूक करावी.
दरम्यान नियमात अशी स्पष्ट तरतुद असताना संस्थाचालकांनी पुरुष मुख्याध्यापक नेमला आहे. त्याबाबत आमचा स्पष्ट आक्षेप आहे. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी तातडीने चौकशी करून के. के. उर्दु गर्ल्स महाविद्यालयात महिला मुख्याध्यापिका याची नेमणूक करावी अन्यथा अमन एज्युकेशन अॅन्ड सोशल मल्टीपर्पज सोसायटी, जळगाव व महाविद्यालयातील मुलींचे पालक एकत्र येवुन आंदोलन करतील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.