पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामपंचायत सदस्या कल्पना सुनीलराव पवार यांची अमळनेर तालुक्याच्या सल्लागार समितीवर अशासकीय सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामपंचायत सदस्या कल्पना सुनीलराव पवार यांची कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माअंतर्गत अमळनेर तालुक्याच्या सल्लागार समितीवर अशासकीय सदस्यपदी निवडीचे पत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांचे अभिनंदचे नुकतेच पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.
कल्पना सुनीलराव पवार यांची पातोंडा गटामधून महिला वर्ग मधून त्यांना या समितीवर संधी दिली गेली आहे. त्यांचे आमदार अनिल पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, माजी आमदार साहेबराव पाटील, कामगार संघटना नेते एल टी पाटील, जळगाव जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्ष कविता जितेंद्र पवार, भागवत सुर्यवंशी यांनी त्यांचे कौतुक केले व पातोंडा येथील राष्ट्रवादीचे संदीपराव पवार, जितेंद्र पवार, राहुल पवार माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांनी कौतुक केले. कल्पना पवार या माजी सरपंच तथा तालुका दक्षता समितीचे सदस्य सुनील गुलाबराव पवार यांच्या पत्नी आहेत.