सिडनी (वृत्तसंस्था) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं सुरूवातीचं दोन सामने जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. याच दरम्यान, ऑस्ट्रेलियाला एका धक्का बसला आहे. संघाचा धडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा दुखापतीमुळे शेवटच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही.
रविवारी झालेल्या सिडनी येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या दुसऱ्या डावादरम्यान वॉर्नरला दुखापत झाली. दुसऱ्या डावातील चौथ्या षटकांमध्ये शिखर धवननं मारलेला चेंडू रोखण्यासाठी वॉर्नर जात असताना त्याच्या डाव्या पायाला मोठी दुखापत झाली आणि त्यामुळे त्याच्या मांडिचे स्नायू दुखावले गेले. मैदानात वॉर्नरला खूप वेदना होऊ लागल्याने त्याला त्वरित मैदान सोडावं लागले आणि त्यानंतर लगेचच त्याला एक्स-रे साठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.