चंदीगड (वृत्तसंस्था) आम आदमी पक्षाचे (AAP) माजी नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासून असलेल्या कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. ‘पंजाबचा CM बनेन किंवा खलिस्तानचा पहिला PM’ असे केजरीवाल यांनी बोलताना एकता आपल्याला सांगितले होते, असे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे.
कुमार विश्वास म्हणाले, ‘पंजाब केवळ एक राज्य नाही तर एक भावना, हे अरविंद केजरीवाल यांनी समजून घेतलं पाहिजे. मी आधीही त्यांना म्हटलो होते. फुटिरतावादी आणि खलिस्तानवादी संघटनांसोबत असलेल्या लोकांना सोबत घेऊ नका. तेव्हा केजरीवाल मला म्हणाले होते की, असं काही होणार नाही, तू चिंता करू नको.. ‘ मुख्यमंत्री कसे बनणार, याचा फॉर्म्युलाही अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याचे कुमार विश्वास म्हणाले. भगवंत कौर यांना निवडणूक लढवायला लावणार आणि मी तिथे पोहोचेन, असा फॉर्म्युला त्यांनी सांगितला होता. आजही अरविंद केजरीवाल त्याच मार्गावर आहेत. कुणी मान्य करो अथवा न करो, ते एखादा बाहुला बसवतील आणि काहीही करतील… त्यांनी माझ्याशी एवढ्या भयंकर गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पंजाबमधल्या बहुतांश जनतेला माहिती आहेत.”
स्वतंत्र खलिस्तानचा पहिला पंतप्रधान बनेन…
कुमार विश्वास म्हणाले, ‘ एक दिवस अरविंद केजरीवाल मला म्हणाले, तू चिंता नको करू. मी एक तर पंजाब सुभ्याचा मुख्यमंत्री बनेन. मी म्हणालो, हा अलगाव वाद 2020 चा रेफरंडम येतोय, सगळं आयएसआयपासून सगळे फुटिरतावादी याला फंडिंग करत आहेत. तर ते मला म्हणाले तर मग काय होईल, मी स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान बनेन. या माणसाच्या विचार प्रक्रियेतच खूप फुटिरतावाद भरला आहे. मला सत्ता मिळाली पाहिजे, अशीच त्यांची इच्छा आहे,’ असे आरोप कुमार विश्वास यांनी केले.