मुंबई (वृत्तसंस्था) रश्मी शुक्ला (Reshma Shukla) फोन टॅपिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांना कुलाबा पोलिसांनी समन्स बजावलं आहे. तसेच उद्या जबाब नोंदवण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितलं आहे.
रशमी शुक्ला यांच्याकडून करण्यात आलेल्या एकनाथराव खडसे यांचा फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलिसांनी खडसेंना समन्स बजावला आहे. कुलाबा पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी खडसे यांना गुरुवारी हजर राहण्यास सांगितले आहे. एकनाथ खडसे उद्या कुलाबा पोलीस ठाण्यात जवाबासाठी 11 वाजता हजर राहणार आहेत. खडसेंनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.
रश्मी शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. त्यानुसार रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.